त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर
नाशिक

त्र्यंबकेश्वर : दुधाची किटली दाखवत भाजपचे आंदोलन

तहसीलदारांना निवेदन

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर तालुका भाजप कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुध दरात वाढ मिळावी या करिता दुधाची किटली दाखवत आंदोलन करण्यात आले.

दरम्यान राज्यभर दूध दरवाढसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबक तालुका भाजप पदाधिकाऱ्यांकडून दूध किटली दाखवत जव्हार फाटा येथे आंदोलन करण्यात आले. तसेच तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन देण्यात आले.

यावेळी दूध खरेदी दर ३० रुपये लिटर करावा, दूध भुकटी निर्यात करण्याला ५० रुपये अनुदान देणे, गायीच्या दुधाला १० रुपये अनुदान लिटर मागे देणे इ मागण्या करण्यात आले.

भाजप तालुका अध्यक्ष विष्णु दोबाडे यांचे मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. यावेळी हर्षल भालेराव सुयोग वाडेकर, पवन बोरसे, प्रवीण पाटील, पुंडलिक गोऱ्हे, विजू पुराणिक या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com