१२ आमदारांचे निलंबन : येवल्यात भाजपतर्फे निषेध

१२ आमदारांचे निलंबन : येवल्यात भाजपतर्फे निषेध

येवला | प्रतिनिधी | Yeola

भाजपच्या (Bharatiya Janata Party) १२ आमदारांच्या निलंबन केल्यामुळे येवला तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विंचुर चौफुली (Vinchur Chaufuli) व तहसील येथे सरकारचा निषेध करून नायब तहसीलदार बुरुंगुळे यांना निवेदन देण्यात आले...

निवेदनात म्हंटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) तालिबानी पद्धतीने लोकशाही मुल्ये पायदळी तुडवून भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले आहे.

ओबीसी आरक्षण (OBC reservation) प्रश्नावर सरकारला उघडे पाडल्यामुळे खोटे आरोप लावून सरकारने भाजपाचे १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. हवे तर भाजपचे सर्व आमदार निलंबित करा पण, ओबीसी आरक्षण परत मिळण्यासाठी आमचा संघर्ष असाच सुरू राहील.

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग आहे. सभापतींना कोणतीही शिवीगाळ भाजपाच्या सदस्यांनी केली नाही. विरोधकांची संख्या कमी केली तर आपल्यावर कमी टीका होईल, न्या. भोसले समितीने स्पष्टपणे सांगितले की, राज्य सरकारला तत्काळ मागासवर्ग आयोग गठित करावा लागेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात जे सांगितले आहे तीच कार्यवाही करावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक डेटा तयार करावा लागेल. मागासवर्ग आयोग स्थापन करणे हा एकमेव पर्याय असल्याचे ठाकरे सरकारने तयार केलेली समितीच सांगते आहे.

हे सरकार यासंदर्भात सुद्धा केंद्र सरकारकडे ठराव पाठविते आहे. त्यांना केवळ वेळ काढायचा आहे. टोलवाटोलवी करायची आहे. त्यांना आरक्षण द्यायचे नाही आणि याविरुद्ध विरोधक आवाज उटवटत असताना त्यांची गळचेपी करण्याचे काम हे राज्य सरकार करत आहे. या घटनेचा भारतीय जनता पार्टी, येवला ग्रामिणच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे सचिन दराडे, आनंद शिंदे, नंदकुमार शिंदे, धनंजय कुलकर्णी, नानासाहेब लहरे, गोरख खैरनार, संतोष काटे, संतोष केंद्रे, छगन दिवटे, युवा चेतन धसे, विशाल शिखरे, बाळासाहेब देशमुख, संतोष मुथा, महेश देशमुख, स्वप्निल करंजकर आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com