पिंपळगाव टोल नाक्यावर भाजपचे आंदोलन

पिंपळगाव टोल नाक्यावर भाजपचे आंदोलन

पिंपळगाव बसवंत। प्रतिनिधी Pimpalgaon

येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) पीएनजी टोल नाक्यावर (PNG toll naka) भारतीय जनता युवा मोर्चाच्या (Bharatiya Janata Yuva Morcha) कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडची (Service Road) अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पिंपळगाव बसवंत हे कांदा (onion), टोमॅटो (tomato), डाळिंब, बेदाणा व भाजीपाला यांची बाजारपेठ असल्याने मार्केट कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा चालू असते. अलीकडे पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर खड्डे पडलेले आहे.

त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट (Street light) आणि बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होतात. पिंपळगाव मधील उड्डाणपूल (flyover) सुरू झाल्यानंतर महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडची अवस्था दयनीय झाली आहे. त्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे सतीश मोरे व यतीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढून टोल व्यवस्थापकास निवेदन देण्यात आले.

त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळगाव शहरातून जाणारा नॅशनल हायवे (National Highway) लगतचा सर्व्हिस रोड जेव्हापासून उड्डाणपूल चालू झाला आहे तेव्हापासून त्या रस्त्यावर खूप मोठे खड्डे झाले असून ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे. दुरुस्ती करतांना पिंपळगाव शहरातील होणारी वाहतूक अवजड स्वरुपाची आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडचे काम हे राष्ट्रीय महामार्ग ज्या प्रमाणे अवजड वाहतूक होऊनही तो खराब होत नाही.

त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळगाव शहरातून जाणारा नॅशनल हायवे (National Highway) लगतचा सर्व्हिस रोड जेव्हापासून उड्डाणपूल चालू झाला आहे तेव्हापासून त्या रस्त्यावर खूप मोठे खड्डे झाले असून ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे. दुरुस्ती करतांना पिंपळगाव शहरातील होणारी वाहतूक अवजड स्वरुपाची आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडचे काम हे राष्ट्रीय महामार्ग ज्या प्रमाणे अवजड वाहतूक होऊनही तो खराब होत नाही.

अशाच प्रतीचे सर्व्हिस रोड बनवावेत. जेणेकरून दरवर्षी येणार्‍या पावसाळ्यात सर्व्हिस रोड खराब होणार नाही. तसेच शिवाजीनगर रस्त्यालगत जो नाला आहे त्यावर आवरण टाकून ते झाकणे. तसेच संपूर्ण सर्व्हिस रोडवर स्ट्रीट लाईट लावण्यात यावे. वणी चौफुली, उंबरखेड चौफुली व एसटी डेपो समोरच्या बोगद्यात रात्रीच्या वेळेस लाईट बंद असतात

पावसानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून त्याचा निचरा होत नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे खूप वेळा छोटे-मोठे अपघात देखील झाले आहेत. तरी सर्व बोगद्यामधील लाईट त्वरित सुरू करण्यात यावे व पावसाचे पाणी जाण्यासाठी सोय करावी. या सर्व बाबींच्या संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा भारतीय युवा मोर्चा च्या वतीने आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात येईल.

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे सतीश मोरे, प्रशांत घोडके, यतीन कदम, अल्पेश पारख, गोविंद कुशारे, संदिप झुटे, जय रावल, चिंधू काळे, दत्तु मोरे, प्रमोद ठाकरे, प्रणव सझगुले, रवी जाधव, अमोल आहिरे, रोहित आहिरे आदींसह पिंपळगाव, ओझर, कोकणगाव परिसरातील भाजप युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com