भाजप युवा मोर्चाचे राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन

भाजप युवा मोर्चाचे राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन

नाशिक | Nashik

काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते आणि माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याशी करणारा व्हिडीओ काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजवरून प्रसारित करण्यात आला होता. त्या व्हिडीओच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगरच्या वतीने रविवार कारंजा येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारुन काँग्रेस पक्षाचा व राहुल गांधींचा (Rahul Gandhi) निषेध करण्यात आला....

भाजप युवा मोर्चाचे राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन
सुरगाणा बाजार समिती सभापतीपदी पवार, उपसभापतीपदी चौधरी यांची निवड

महाराष्ट्र कॉंग्रेसने (Maharashtra Congress) हा व्हिडीओ ब्लॉक करावा. सोशल मीडियातून तो डिलिट करावा अन्यथा भाजप (BJP) तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिल्यानंतरही व्हिडीओ डिलिट न केल्याने काँग्रेस पक्षाचा व राहुल गांधीचा भाजप युवा मोर्चाकडून निषेध करण्यात आला.

भाजप युवा मोर्चाचे राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ भावंडांचा मृत्यू

तसेच दि.६ जून रोजी ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार असल्याने त्याची जय्यत तयारी सुरु असताना कॉंग्रेस पक्षाने मात्र राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.याचा निषेध करण्यासाठी नाशिक भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी (Activists) डोक्याला काळया पट्या बांधून जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

भाजप युवा मोर्चाचे राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन
लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी क्षीरसागर तर उपसभापतीपदी डोमाडे

दरम्यान, याप्रसंगी भाजपा युवा मेार्चा शहराध्यक्ष अमित घुगे, प्रदेश सचिव विजय बनछोडे, शहर सरचिटणीस निखीलेश गांगुर्डे, सागर शेलार, देवदत्त जोशी, वसंत उशीर, प्रतिक शुक्ल, राहुल कुलकर्णी, अनिल भालेराव, राकेश पाटील, महेश भामरे, सुनिल वाघ, प्रविण भाटे, पवन उगले, ऋषिकेश शिरसाठ, हर्षद जाधव, विपुल सुराणा, विजय गायखे, विक्रांत गांगुर्डे, कुणाल निफाडकर, सनी गोसावी, अक्षय गांगुर्डे, विनोद येवलेकर यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com