त्रिमूर्ती चौकात भाजपचे निदर्शने; आमदार सीमा हिरेंसह अनेक कार्यकर्ते ताब्यात

त्रिमूर्ती चौकात भाजपचे निदर्शने; आमदार सीमा हिरेंसह अनेक कार्यकर्ते ताब्यात

नवीन नाशिक | प्रतिनिधी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज नवीन नाशिक परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे निदर्शने केली. यान आंदोलनाला भाजप महिला मोर्चाच्या नेत्या चित्रा वाघ यादेखील उपस्थित राहणार होत्या मात्र त्या आंदोलनस्थळी आल्या नाहीत.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन गुंडाळले. पोलिसांनी आमदार सीमा हिरे, संध्या कुलकर्णी, रोहिणी नायडू, रश्मी हिरे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, अलका अहिरे, मनीषा पवार यांना ताब्यात घेतले.

आंदोलनादरम्यान वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनामयाची मागणी करण्यात आली. तसेच राज्यात वाढलेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी महिला आंदोलकांनी केल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com