दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत भाजप सर्व जागा लढवणार

दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत भाजप सर्व जागा लढवणार

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

आगामी नगरपंचायत निवडणूकीत (Nagar Panchayat elections) दिंडोरीमध्ये भाजपाने (BJP) संपूर्ण ताकदीने 17 जागा लढविण्याचा निर्णय आज घेण्यात आला. यावेळी प्रत्येक प्रभागात सक्षम व प्रबळ संभाव्य उमेद्वारांच्या निश्चितीची चर्चा करण्यात आली...

भाजप नेते विवेक कुलकर्णी (Vivek Kulkarni) यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजप पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. दिंडोरी शहरातील जनता नगरपंचायतीच्या कारभारावर प्रचंड नाराज असून या निवडणूकीत भ्रष्टाचार, मनमानी कारभार, जनतेची पिळवणूक, ठेकेदारी, गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय हे प्रमुख मुद्दे भाजपाकडून निवडणूक प्रचारात वापरण्याचे ठरविण्यात आले.

ही निवडणूक केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar), माजी पालकमंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan), जिल्हाध्यक्ष केदा आहेर, तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.

यावेळी प्रमुख नेत्यांशी व्हिडीओवरुन संपर्क साधून चर्चा करण्यात आली. प्रमुख नेत्यांनी दिंडोरी नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात यावी, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने रिंगनात उतरावे, असे आवाहन केले.

प्रत्येक प्रभागात कोणते संभाव्य उमेद्वार राहतील, याची चर्चा झाली. भाजपाच्या इच्छुक उमेद्वारांची प्रत्येक प्रभाग निहाय यादी करण्यात आली. ती वरिष्ठाकडे पाठवण्याचा निर्णय झाला. पुढील बैठकीत नियाजेन करण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी गटनेते प्रमोदशेठ देशमुख, विवेक कुलकर्णी, चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, विलास देशमुख, फारुकबाबा, बाबुशेठ मनियार, दत्तात्रय जाधव, भास्कर कराटे, रणजित देशमुख, संपत पिंगळ, काका देशमुख, रवीशेठ जाधव, नगरसेवक तुषार वाघमारे, शहराध्यक्ष शाम मुरकूटे, अमर राजे, निलेश गायकवाड, तुषार घोरपडे, गणेश देशमुख, धीरज चव्हाण, नरेश चव्हाण आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com