भाजपचा पोलीस आयुक्तांना गंभीर इशारा; सर्व पोलीस ठाण्यांबाहेर...

भाजपचा पोलीस आयुक्तांना गंभीर इशारा; सर्व पोलीस ठाण्यांबाहेर...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकच्या पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी (Police Commissioner Deepak Pandey) बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी फौजफाट पाठवावा. अन्यथा भाजपच्या वतीने सर्व पोलीस (Police) ठाण्यांबाहेर ढोल बजाव आंदोलन (Agitation) केले जाईल, असा इशारा भाजप (BJP) नाशिक महानगर सरचिटणीस व कादवा साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दिला आहे...

पंचवटी परिसर, पेठरोड व दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. या बाजार समितीत काही तथाकथित स्वतःला हमाल, व्यापारी, दलाल म्हणविणारे दादागिरी करून राजरोस शेतकर्‍यांची लुट करत आहे.

शेतकर्‍यांकडून जास्तीच्या पालेभाज्यांच्या जुड्या घेतल्या जातात. तसेच ज्या भावात लिलावात भाजीपाला विकला जातो तो भाव माल व्यापार्‍यांच्या गाळ्यावर गेल्यावर दमदाटी, दादागिरी करून भाव कमी केला जातो. आपला माल पुन्हा कोणी घेणार नाही या भीतीने शेतकरी मुकाट्याने हे सर्व सहन करत आहे.

या ठिकाणी गुंडांची टोळी, हमाल, मापारी, व्यापारी, दलाल यांची साखळी आहे. त्यामुळे पंचवटीत कायदा व सुव्यवस्थेचा पुर्ण बोजवारा उडाला आहे. पंचवटी परिसरात दिवसाढवळ्या खून, जिवघेणे हल्ले, चोर्‍या, अवैध व्यवसाय, अफू, चरस, गांजाचा व्यवसाय, दरोडे, बलात्कार हे सुरु असून पोलीस खात्याने यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी पोलीस आयुक्तांनी विना हेल्मेट पेट्रोल देऊ नये, म्हणून.पोलिसांनी प्रत्येक पेट्रोल पंपावर नेमण्यात आले आहे.

पंचवटी परिसरात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे देशविदेशातून भाविक व पर्यटक येथे येतात. गोदावरी व रामकुंड परिसरात तर दररोजच गर्दी असते. या ठिकाणी चोरी होणे ही बाब नित्याचीच झाली आहे. बहुतांश लोक पोलीस ठाण्यात तक्रार देत नाही. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असल्याचे केदार यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com