भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे नाशिकरोडला जंगी स्वागत

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे नाशिकरोडला जंगी स्वागत

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांचे आज नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (Nashik Road Railway Station) आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले...

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बावनकुळे हे प्रथमच नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आले असून सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आगमन होताच त्यांचे आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande)आ. सीमा हिरे (MLA Seema Hire) आ.राहुल ढिकले (MLA Rahul Dhikle) शहराध्यक्ष गिरीश पालवे (City President Girish Palve) तसेच नाशिकरोड अध्यक्ष हेमंत गायकवाड, संगीता गायकवाड, बाजीराव भागवत, राजेश आढाव, नितीन खोले आदींनी स्वागत केले.

त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत नाशिकरोड परिसरातून बाईक रॅली (Bike Rally) काढण्यात आली. यावेळी बावनकुळे म्हणाले की, आजच्या स्वागताने मी भारावून गेलो असून नाशिकमधील हा आनंद आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या विजयात होईल. तसेच नाशिक महानगरपालिकेवर (Nashik Municipal Corporation) भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com