बिनविरोध निवडणूकीसाठी भाजप तयार-  खा. डॉ. सुभाष भामरे

बिनविरोध निवडणूकीसाठी भाजप तयार- खा. डॉ. सुभाष भामरे

सटाणा । प्रतिनिधी Satana

विकासकामांना Devlopment works गती देण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. शहरात आगामी नगरपरिषद निवडणूक Town council elections बिनविरोध होण्याबाबत भाजपची BJP तयारी असली तरी यासंदर्भात शहर विकास आघाडी व इतर पक्षांची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे सूतोवाच खा. डॉ. सुभाष भामरे MP Dr. Subhash Bhamre यांनी येथे बोलताना केले.

सनपातर्फे येथील देवमामलेदार सभागृहात आयोजित पुनद जलपूजन Punad Jalpujan कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना खा. डॉ. भामरे बोलत होते. आ. दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, विजय वाघ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शहरातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेत राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून 55 कोटी रुपये खर्चाची पुनद पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याबरोबर शहरातील बहुतांश विकासकामे पूर्ण केल्याचे खा. डॉ. भामरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार संजय चव्हाण यांनी शहराच्या पाणीप्रश्नाबाबत यापूर्वी झालेल्या प्रयत्नात लोकनेते स्व. पंडितराव धर्माजी पाटील, स्व. अर्जुनराव अहिरे, स्व. सुलोचना चव्हाण या माजी नगराध्यक्षांच्या कार्यकाळात ठेंगोडा तसेच केळझर योजनेसंदर्भात माहिती देत पाण्यासाठी झालेल्या संघर्षानंतर कळवण तालुक्यातील स्व.ए.टी. पवार यांनीदेखील पुनद धरणात शहरासाठी आरक्षण देण्यासाठी सहकार्य केल्याचे स्पष्ट करत सद्यस्थितीत नगराध्यक्षांना खा. डॉ. भामरे यांचे पाठबळ लाभल्याचे सांगितले.

नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी उच्च न्यायालयात पुनदच्या पाण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका निर्णायक असल्याचे स्पष्ट करत ठेंगोडा येथील जॅकवेलची अडचण लक्षात घेता पुनद परिसरात सक्षम जॅकवेलच्या माध्यमातून शहरात पुढील 50 वर्षे दुष्काळ भासणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

प्रारंभी सटाणा-नाशिक रस्त्यालगत पुलाजवळ पाण्याचे पूजन झाल्यानंतर देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरापासून सजवलेल्या बैलगाडीवर वाद्यवृंदासह पुनदचे पाणी असलेल्या मिरवणुकीचा शुभारंभ आ. दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. भामरे यांच्या हस्ते देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या चांदीच्या मूर्तीचे व जलकुंभाचे पूजन करण्यात आले. तसेच पुनद पाणीपुरवठा योजनेचे याचिकाकर्ता अ‍ॅड. दीपक सोनवणे यांचा खा.डॉ. भामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास दादा जाधव, पांडुरंग सोनवणे, डॉ. शेषराव पाटील, भाजप तालुकाध्यक्ष संजय देवरे, राहुल सोनवणे, मंगेश खैरनार, सनपा गटनेते राकेश खैरनार, दिनकर सोनवणे, नितीन सोनवणे, महेश देवरे, डॉ. विलास बच्छाव आदींसह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेंद्र शर्मा व मनोहर देवरे यांनी केले. आभार डॉ. विद्या सोनवणे यांनी मानले. दरम्यान, शहरात आयोजित जलकलशाच्या मिरवणुकीत नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करत फुलांचा वर्षाव केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com