१२ आमदारांचे निलंबन; नाशकात भाजपकडून निषेध

१२ आमदारांचे निलंबन; नाशकात भाजपकडून निषेध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दोन दिवसात महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Assembly Session) गुंडाळणे व अधिवेशनात भाजपच्या (Bharatiya Janata Party) १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन (Suspension of MLAs) करण्यात आल्यामुळे नाशिक महनगर भाजपने निषेध व्यक्त केला...

महानगर भाजपतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रपतींना भाजप नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palve) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नगरसेवक प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते विजय साने, नाशिक महानगर महिला मोर्चा अध्यक्ष हिमगौरी आडके, महिला मोर्चा सरचिटणीस शिल्पा पारनेरकार, पूर्वा सावजी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यायला हे सरकार घाबरते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगराच्यावतीने आज लोकशाही वाचवा दिन पाळला.

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, संख्याबळ कमी करण्यासाठी रचलेला हा कुटील डाव म्हणून १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केल्यामुळे राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com