ख‍ा. डाॅ. पवार प्रवक्तेपदी तर सावजी; पेशकार पॅनेलिस्टमध्ये

ख‍ा. डाॅ. पवार प्रवक्तेपदी तर सावजी; पेशकार पॅनेलिस्टमध्ये
ख‍ा. डाॅ. पवार प्रवक्तेपदी तर सावजी; पेशकार पॅनेलिस्टमध्ये

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

भाजप प्रदेशकडून प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची यादी घोषित करण्यात आली आहे. दिंडोेरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डाॅ.भारती पवार यांची उत्तर महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

तर लक्ष्मण सावजी व प्रदीप पेशकार यांची पॅनेलिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटिल यांनी ही यादी प्रसिध्द केली.

दहा जणांच्या यादीत डाॅ.पवार यांच्यासह गोपीचंद पडळकर, राम कदम, धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. तर पॅनेलिस्टच्या यादीत पेशकार, सावजी यांच्यासह ३३ जणांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com