बँक अपहारातील पैसे तात्काळ हवे; आ.डॉ.राहुल आहेरांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

बँक अपहारातील पैसे तात्काळ हवे; आ.डॉ.राहुल आहेरांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक । Nashik

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) भऊर (Bhaur) ता. देवळा (Deola) येथे झालेल्या आर्थिक अपहारातील (Financial embezzlement) पैसे शेतकऱ्यांना तात्काळ परत मिळावे, अशी मागणी आ.डॉ. राहुल आहेर (MLA.Dr. Rahul Aher) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्याकडे सोमवार (दि. १८) रोजी मुंबई येथे भेट घेऊन पत्राद्वारे केली. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Finance State Minister Dr. Bhagwat Karad) यांच्याकडे सुद्धा त्यांनी निवेदनाद्वारे सदर मागणी केली आहे...

या निवेदनात म्हटले की, चांदवड - देवळा मतदारसंघातील (Chandwad - Deola Constituency) बँक ऑफ महाराष्ट्र, भऊर ता.देवळा ह्या शाखेत परिसरातील भऊर, विठेवाडी, सावकी खामखेडा, वरवंडी, बगडू आदी गावातील शेतकऱ्यांचे (Farmers) खाते असून बँकेतील काही कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी खात्यात भरणा करण्यासाठी दिलेले पैसे (Money) खोट्या पावत्या देऊन भरले असल्याचे भासवून प्रत्यक्ष पैसे भरलेच नसल्याचे उघड झाले आहे. तसेच पीक विमा कर्जाचे पैसे असो किंवा मुदत ठेवीचे पैसे असो यात देखील मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. प्रथमदर्शी ५ ते ६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लक्षात येत आहे. देवळा पोलिसांनी (Deola Police) बँकेच्या शाखा अधिकाऱ्यासह अन्य दोघांना अटक (Arrested) केली असून सध्या आरोपींना (Accused) न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे.

तसेच सध्या शेतीच्या लागवडीचे (Agricultural Cultivation) दिवस सुरू असल्याने व शेतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असल्याने या घटनेत जबाबदा-या निश्चित करण्याचे काम अथवा तपास हा सुरू राहील. परंतु पैसे पण गेले व पीक (Crop) ही जाण्याच्या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा अपहार झालेला पैसा बँकेने (Bank) जबाबदारी घेऊन त्यांच्या खात्यात वर्ग करावे यासाठी आपल्या स्तरावरून मदत करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com