दादा भुसेंना पालकमंत्रिपदावरून हटवावे;भाजप नेत्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

दादा भुसेंना पालकमंत्रिपदावरून हटवावे;भाजप नेत्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक | Nashik

शिंदे गट आणि भाजपमध्ये (Shinde group and BJP) सुरू असलेला वाद आता चव्हाट्यावर आला असून शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून हटवावे अशी मागणी भाजप नेत्याने केली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची (Dispute) ठिणगी पडली आहे...

मालेगावमधील भाजप नेते डॉ. अद्वय हिरे (BJP leader Dr.Advay Hiray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून दादा भुसे यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून हटवावे अशी मागणी केली आहे.पालकमंत्री दादा भुसे हे ठेकेदाराला पोहोचण्यासाठी चारी बंद करून पाईपलाईनद्वारे पाणी पिण्याचा घाट घालत असल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे. त्यांच्या या मागणीमुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान, मालेगावमधील बोरे आंबेदरी येथील पाण्याची चारी बंद करण्याचा निर्णय भुसे यांनी घेतल्याने शेतकरी (Farmer) आणि भाजप नेते संतप्त झाले आहेत. याच विषयावरून काल (दि.३) रोजी एका शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला होता. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून आता भाजप नेते अद्वय हिरे यांनी भुसे यांना पालकमंत्रिपदावरून हटवावे,अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com