भाजप नेते सुधीर मुनगंटीवार 'त्र्यंबकराज'चरणी लीन

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार 'त्र्यंबकराज'चरणी लीन

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकेश्वराच्या दरबारी दर्शन घेतले. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांचे त्र्यंबक नगरीमध्ये आगमन झाले. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मंत्री असतांना त्यांनी त्र्यंबकेश्वर नगर पालिकेकडे विशेष लक्ष देत निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. याच पद्धतीने यापुढेदेखील त्यांनी लक्ष द्यावे आणि त्र्यंबकेश्वर पालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सागर उजे, स्वप्नील शेलार, माधवी भुजंग, शीतल उगले, सायली शिखरे, विजय शिखरे, विराज मुळे, धनेश मुंदडा, सुयोग वाडेकर, शामराव गंगापुत्र, श्रीकांत गायधनी, दत्ता जोशी, भुंजग बंधू, निषाद चांदवडकर, बागडे यांची उपस्थिती होती.

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून विश्वस्त तृप्ती धारणे यांनी त्यांचे स्वागत केले. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नाशिकच्या कार्यकर्त्यांनी ईश्वर या दिनदर्शिकचे प्रकाशन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com