अन् पंकजा मुंडेंचा अचानक नाशकात सिटी बसमधून प्रवास..!

अन् पंकजा मुंडेंचा अचानक नाशकात सिटी बसमधून प्रवास..!

नाशिक । Nashik

भाजपच्या राष्ट्रीय सचिव (BJP national secretory) आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज अचानक नाशिक महापालिकेच्या सिटीबसमधून (Nashik Municipal corporation citilink) प्रवास केला. पंकजा यांनी अचानक बसमध्ये चढल्यामुळे सर्वांनाच आश्चर्यचकित झाले. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: तिकीट काढून हा प्रवास केल्यामुळे या प्रवासाची सर्वत्र चर्चा होती...

पंकजा मुंडे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी माऊली नगरातील एका गृह प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम झाल्यानंतर त्या बाहेर आल्या. रस्त्यावर उभ्या असलेल्या सिटी बसमध्ये बसून त्यांनी पुढील प्रवास केला.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार जयकुमार रावल, सीमा हिरे, महापौर सतीश कुलकर्णी होते. बसमधील वाहकाकडून तिकिट काढून त्यांनी सावरकर नगर ते अशोकनगर असा प्रवास केला. ही बस सेवा अल्पावधीतच अतिशय उपयुक्त ठरली असून महापालिकेने सुमारे 250 बस यासाठी रस्त्यावर उतरवल्या आहेत.

या सेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. या सेवेबद्दल पंकजा मुंडे यांनी महापौरांचे विशेष कौतुक केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com