पंकजा, खा.प्रितम मुडेंसह केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड येणार एकाच व्यासपीठावर

पंकजा, खा.प्रितम मुडेंसह केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड येणार एकाच व्यासपीठावर

नाशिक | Nashik

भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) खासदार डॉ. प्रितम मुंडे (MP Dr. Pritam Munde)आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) रविवारी (ता.८) एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात मुंडे बघिणी काय बोलतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे...

असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स (Association of We Professionals) नाशिकतर्फे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी विशेष चर्चासत्र (विद्यार्थी समिट) तसेच राज्यस्तरीय वंजारी युवा सन्मान पुरस्कार (Vanjari Yuva Samman Award) वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.८) सकाळी ९.३० वा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सभागृहात होणा-या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी युवा सन्मान पुरस्काराचे वितरण होणार आहे.

तसेच समिटमध्ये विद्यार्थ्यांसाठी अॅड.अरविंद आव्हाड (भारतीय संस्कृती व व्यक्तिमत्त्व विकास), बाळासाहेब दराडे(स्टार्ट अपमधील संधी व आव्हाने),क्रिकेटपटू संजय बांगर (क्रीडा क्षेत्रातील संधी),सत्यजित व अजिंक्य हांगे (ऍग्रो स्टार्ट अप- संधी आणि आव्हाने), प्राचार्य गजानन सानप (नवीन शैक्षणिक धोरण) यासह आदी विषयांवर वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, सायंकाळी ५ वाजता पंकजा मुंडे यांच्या हस्ते व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा माजी अध्यक्ष अॅड. सुधाकर आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील युवकांचा राज्यस्तरीय युवा सन्मान पुरस्काराने सन्मान होईल. या  कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्सचे अध्यक्ष उदय घुगे, उपाध्यक्ष प्रशांत आव्हाड, सचिव निलेश ढाकणे,खजिनदार अविनाश आव्हाड,सचिव वैभव आव्हाड,अशोक कुटे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com