
नाशिक | Nashik
भाजप नेते (BJP leader) किरीट सोमय्या (Kirit Somayya) आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबासह,संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे...
नाशिकमध्ये (Nashik) अखिल भारतीय ब्राम्हण मध्यवर्ती संस्था (All India Brahmin Central Institute) यांच्या वतीने सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ आयोजित केला असून या सोहळ्यासाठी किरीट सोमय्या उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला.
यावेळी ते म्हणाले की, ठाकरे कुटुंबाने (Udhhav Thackeray) गायब केलेल्या १९ बंगल्याचा हिशोब देणे आवश्यक आहे. पत्नीच्या नावाने ऍग्रिमेंट केले, अर्ज केला, स्वतःच्या नावाने प्रॉपर्टी घेतली. मात्र, इन्कम टॅक्सला दाखवले नाही. त्यामुळे चोरी पकडली गेली असून १९ बंगले गेले कुठे? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते बोलतांना म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) ५७ हजाराचे कागद देऊ शकले नाही. १२० रुपयांचा कागद देऊ शकले नाही. या प्रकरणावरून हायकोर्टाने त्यांना तमाचा दिला आहे. त्यावेळी बोगस एफआयआर दाखल करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच भाजप आणि राज्य सरकार एक इंचही जागा कर्नाटकला देणार नसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची ज्यावेळी सत्ता होती, तेव्हा त्यांनी किती जमीन घेतली, अन् आता शेवटी विरोधक काम करायला लागले आहे. पण आता हे प्रकरण न्यायालयीन असल्याने न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे सोमय्या म्हणाले.