...तर इंधन दर आणखी कमी होतील; देवेंद्र फडणवीस

...तर इंधन दर आणखी कमी होतील; देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसराजकीय

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Nashik

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेया त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) प्रांगणात केदारनाथ येथील सोहळ्याचे दर्शन घडले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ex CM Devendra Fadanvis), केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil patil), केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharati Pawar) यांची उपस्थिती होती.

केदारनाथ (Shri Kshetra Kedarnath) येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण त्र्यंबकेश्वर दाखवण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

या ऐतिहासिक सोहळ्यनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, इंधनाचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आता अबकारी कर कमी झाला आहे. राज्य सरकारनेदेखील आता कर कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला पाहिजे. तरीही राज्य सरकारने ठरवले तर अजूनही दर कमी करता येतील.

दिग्गज मंत्री त्र्यंबक नगरीत दाखल झाल्यामुळे परिसराला छावणीचे रूप आले आहे. भव्य मंडप त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात टाकण्यात आला होता. यावेळी विविध नेत्यांची वाहने त्रंबकेश्वर मंदिर परिसरात लगत चौकात लागल्यामुळे मोठी कोंडीदेखील याठिकाणी झाल्याचे बघायला मिळाले.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिरावर कापडी रेशमी भगवा ध्वज कळसावर चढवण्यात येतो. आजही हा झेंडा चढविण्यात आला. याबाबतची अधिक माहिती सुशांत तुंगार यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com