
नाशिक | प्रतिनिधी
सोशल मिडीयावरुन विद्यमान खा. हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या नावाने मित्र पक्ष असलेल्या भाजपाच्या माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नावाने सोशल मिडीयावर प्रसिध्द झालेल्या पत्रावरुन राजकिय वर्तूळातून तर्कवितर्क रंगू लागले होते. मात्र पत्र प्रसिध्द होताच दुपारी दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी त्याबद्दल कानावर हात ठेंवत त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सोशल मिडीयावरुन प्रसिध्द झालेल्या पत्रावर दिनकर पाटील यांचा फोटो असून ते पत्र दिनकर आण्णा पाटील फॅन क्लबच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यानुसार विद्यमान खासदारांना गद्दार संबोधण्यात आले असून त्यात खोक्यांचाही उल्लेख आहे.
यापूर्वी याबाबत फक्त महाविकास आघाडीच बोलत होती. आता भाजपाचे खासदारासाठी इच्छुक उमेदवार दिनकर पाटील बोलत असल्याने शिंदे गटातून नाराजीचे सूर उमटले होते.मात्र दुपारी दिनकर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणाशी माझा काडीचाही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.
गद्दार बिद्दार हे फॅन क्लबच्या माध्यमातून बोललेले आहे. माझा त्यात संबंध नसून शिंदे गट भाजपाची युती असून हे मला माहीत आहे. बाकी लोकांप्रमाणे मी सुपारी घेणारा नाही किंवा वेडापण नाही.
भाजपाच्या वरिष्ठांच्या माध्यमातून रविंद्र अनासपूरे यांनी तयारी करण्याच्या सूचना मागेच दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दोन वर्षापासून मी लोकसभा मतदार संघातून तयारीला लागलेलो आहे. या पूढे पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य राहणार असल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले. या बाबत खा. गोडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्ंयांचयाशी संपर्क होऊ शकलेला नाही.