Video : भाजप सभागृह नेत्याच्या कार्यालयावर टोळक्याचा हल्ला; कारच्या काचाही फोडल्या

Video : भाजप सभागृह नेत्याच्या कार्यालयावर टोळक्याचा हल्ला; कारच्या काचाही फोडल्या

इंदिरानगर | वार्ताहर

प्रभाग क्रमांक 30 चे नगरसेवक तथा सभागृहनेते सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर पंचवीस-तीस जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली...

सोनवणे वापरत असलेली मनपाच्या गाडीच्या काचादेखील फोडण्यात आल्या आहेत. टोळक्याने त्यांच्या कार्यालयात शिरून ऑफिसमधील वस्तूंची नासधूस केली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, हा चौथ्यांदा हल्ला करण्यात आल्याचे सोनवणे म्हणाले. तसेच ज्या व्यक्तीने हल्ला केला तो रात्रीअपरात्री आपल्याला फोन करून शिवीगाळ करत असल्याचादेखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

मतदार संघातील जनता आपल्या पाठीशी आहे. परिसर भयमुक्त करण्यासाठी मी बांधील असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी हल्लेखोराचा बंदोबस्त करावा अशी मागणीदेखील याप्रसंगी करण्यात आली.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी हल्ल्यानंतर माझे बोलणे झाले असून त्यांच्याकडूनदेखील घडलेल्या प्रकारचा निषेध करण्यात आला आहे. लवकरच तेही याबाबत कारवाईची मागणी करणार आहेत अशी माहिती गटनेते सोनवणे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com