‘कमळ’ ताजेतवाने ठेवण्याचे आव्हान

‘कमळ’ ताजेतवाने ठेवण्याचे आव्हान
USER

नाशिक । नरेंद्र जोशी | Nashik

गेल्या तीस वर्षात महतप्रयासाने एक हाती सत्तेपर्यंत पोहचलेल्या भारतीय जनता पक्षा (Bharatiya Janata Party) समोर आज महापालिकेत उमलेले कमळ कायम ताजे तवाने ठेवण्याचे आव्हान सध्या आहे. सन 1992 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुुकीत (election) महापालिकेत 9 नगरसेवक (Corporator) होेते, नतर दहा झाले. दहाचे बारा, बाराचे 22 ंव नंतर थेट 66 नगरसेवकांपयर्ंंत मजल मारत भारतीय जनता पक्षाने अखेर एकाहाती सत्तेचे स्वप्न साकर केले.

मात्र आता राज्यात सत्तांतर झाले. भाजपमध्येही नवा गडी नवा राज सुरु झाले. दिवसेंदिवस वाढत चाललेली अस्वस्था आणि पक्षातील उफाळुन येत असलेल्या गटबाजीमुळे नाशिकचा (nashik) भाजपचा हा अभेद्य बालेकिल्ला काबीज करण्यासाठी विरोधकांंनी कंबर कसली आहे. सत्तेचे स्वप्न विरोधक पाहू लागले आहे. मात्र ते दिवास्वपच ठरेल व त्यांचा भ्रमनिरासच होईल. असा दावा करत भाजप नेते वसंंतस्मृतीतुन कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकवुन ठेवण्याची कसरत आहेत.

गेल्या महिन्यात शिवसेनेच्या (shiv sena) संवाद मेळाव्यात भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी थेट मंचावर जात शिवसेना नेते खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांचा सत्कार केला. यावेळी संगमनेरेच नव्हे तर, भाजपचे 17 ते 18 नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत आगामी निवडणुकीत महापालिकेवर (Municipal Corporation) शिवसेनेचा भगवा फडकणारच असा दावा खा. राऊत यांनी केला होता.

यामुळे भाजपातील गटबाजीचे दर्शन घडले होते. मात्र माजी मंत्री जयकुमार रावल (jaykumar rawal) यांनी शिवसेनेचा हा दावा खोडून काढत घोडा मैदान जवळच आहे. त्यावेळी विरोधकांना नक्कीच समजेल की कुठल्या पक्षातुन कोण कुठे गेले व किती गेले? त्यामुळे हा विषय भाजपसाठी फारसा चिंतेचा नाही. मतदान (voting) हे भाजपला व भाजपशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांना होते. त्यामुळे कोण कुठल्या पक्षात गेले व कोण कुठल्या पक्षातून आले हा विषय भाजपसाठी गौण असल्याचे म्हटले होते.

अजुनही शंभर जागा पटकाविण्यासाठी जुन जाणते पदाधिकाऱी व्युहरचना आखत आहेत. गेल्या पंचवार्षीक मध्ये शहराध्यक्षपदाची धुरा तत्त्कालीन आमदार बाळासाहेब सानप (balasaheb sanap) यांच्याकडे होती. राज्यात भाजपाची सत्ता होती. देवेंंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक दत्तक (Nashik adopted) घेतले होते. इतर पक्षातील माजी आमदार वसंत गिते (vasant gite), सुुनील बागुल (sunil bagul) यांच्या सारखे दिग्गज त्यांच्या साथीला होते. त्यामुळे ते एकहाती सत्तेचे स्वप साकार झाले.

मात्र पाच वर्षात बरेच बदल झाले. आता राज्यात पक्ष विरोधात आहे. गिते, बागुलही दूर गेले आहेत. जयकुमार रावल, आमदार सीमा हिरे (mla seema hirey), देवयानी फरांदे (devyani farande), राहुल आहेर (rahul ahre), केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार (Union Minister of State Dr. Bharti Pawar), महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni), स्थायी समिती सभाापती गिणेश गिते (ganesh gite). पक्षाचे ज्येष्ंठ नेते लक्ष्मण सावजी (laxman savji), विजय साने, बाळासाहेब सानप (balasaheb sanap), शहराध्यक्ष गिरीश पालवे (girish palve), हेमंत धात्रक, सुनील केदार, केदा आहेर यांच्या खांद्यावर सध्या पक्षाची धुरा आहे.

आजपर्यंत शिवसेनेचे बोट धरुन सत्तेची शिडी चढलेला भाजपा आता मनसेचा (MNS) आधार घेण्याची चर्चा आहे. राज ठाकरे व चंद्रकांतदादा पाटील (chandrakant patil) यांची भेटही झाली आहे. परप्रांतीयांच्या मुद्याची फक्त अडचण आहे. त्यातुन मार्ग निघाला तर एक से भले दो म्हणत भाजपा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुध्द् दंंड थोपटल्या शिवाय राहणार नाही. काही झाले तरी यंदा रावल, पालवे यांना आपली ताकद दाखवुन देण्यासाठी व विरोधकांचे आव्हान पेलण्यासाठी अगोदर पक्षांतर्गत वाद संपुष्टात आणुन सर्वांना एकदिलाने उभे करण्याची किमया करावीच लागेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com