भाजपचे शेकडो कार्यकर्ते ताब्यात; चक्काजाम आंदोलनप्रसंगी पोलिसांची कारवाई

भाजपचे शेकडो कार्यकर्ते ताब्यात; चक्काजाम आंदोलनप्रसंगी पोलिसांची कारवाई

नाशिक। प्रतिनिधी

ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित झाल्यामुळे भाजप ओबीसी मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने आज सकाळी विल्होळी जकात नाका परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी नाशिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले...

आंदोलनस्थळी महाविकास आघाडी, कॉंग्रेस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्य शासनाची खेळी ओबीसी आरक्षणाचा बळी, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे आघाडी सरकारकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. अशा घोषणा याप्रसंगी कार्यकर्त्यांनी दिल्या.

हे आंदोलन भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदेे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, महापौर सतीश कुलकर्णी, आ. सीमा हिरे, राहुल ढिकले, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नाशिक महानगर भाजप संघटन सरचिटणीस नगरसेवक प्रशांत जाधव, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने, भाजप ओबीसी मोर्चा नाशिक महानगर अध्यक्ष चंद्रकांत थोरात, भाजप ओबीसी मोर्चा नाशिक महानगर सरचिटणीस सतीश रत्नपारखी, प्रणव शिंदे, सरचिटणीस ओबीसी मोर्चा नाशिक महानगर राजेश दराडे यांच्या उपस्थित झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com