शरद पवार
शरद पवार
नाशिक

पवारांची नाशिक बैठक अवैध : भाजपा का आक्रमक?

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडिचे मार्गदर्शक शरद पवार जिल्हाधिकारी कार्यालयात थोडयाच वेळात करोना आढावा बैठक घेणार असून त्यावरुन आता राजकीय वातावरण तापले आहे. पवार हे फक्त एका पक्षाचे अध्यक्ष असून सध्या ते खासदार आहे. त्यांच्याकडे कोणतेही मंत्रीपद नाही. असे असताना ते बैठक कशी घेऊ शकतात असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

शिवाय विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या दौर्‍यात शासकिय अधिकार्‍यांनी उपस्थित राहू नये असे परिपत्रकाद्वारे अ‍ादेश देण्यात आले आहे. महाविकास आघाडी राजकारण करत असून त्याचा निषेध म्हणून पवार यांच्या बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला असून उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना बाबत संबंधित खात्यातील मंत्री किंवा पालकमंत्री यांच्यासह सत्तेत सहभागी असलेल्या मंत्रिमंडळाला आढावा बैठक घेता येतो. ते बघता शरद पवार हे कायद्यानुसार बैठक घेऊन शकत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी पवार यांच्या बैठकीला परवानगी कशी दिली असा सवाल आ.प्रा. देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला आहे. या अगोदर झालेल्या बैठकांना शहरातील भाजप आमदारांना बोलविण्यात आले नाही, असा नाराजीचा सूरही भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे. राजेश टोपे हे आरोग्य खात्याचे मंत्री असून ते बैठक घेऊ शकतात. मात्र शरद पवार यांच्या उपस्थितीला भाजपने विरोध केला आहे.

भाजपशहराध्यक्ष गिरीश पालवे यांनीही आक्षेप नोंदवला असून ही बैठक आरोग्य मंत्री राजेश टोपे पालकमंत्री छगन भुजबळ आणि स्थानिक आमदार यांच्या सोबत घेतली पाहिजे असे म्हटले आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे शहराध्यक्ष पालवे यांनी सांगितले. एकूणच पवार यांच्या बैठकिवरुन महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा नवा वाद रंगण्याची जोरदार चिन्हे आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com