Video : 'ते' पोस्टर हटवा; वादग्रस्त लिखाणावर कारवाई करा; भाजप आक्रमक

Video : 'ते' पोस्टर हटवा; वादग्रस्त लिखाणावर कारवाई करा; भाजप आक्रमक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण लिहले असून सामनाच्या संपादकावर कारवाई करा, अशी मागणी नाशिक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे (MLA Deoyani Farande), शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palave) यांच्यासह नगरसेवक व इतर पदाधिकारी पोलिस आयुक्तालयात आले त्यावेळी त्यांनी ही मागणी केली....

आज (दि २५) सकाळी शहरात सामनाच्या अग्रलेखाचे (Samana Editorial) होर्डिंग लागले. आ. फरांदे यांनी केलेल्या आरोपानुसार पोलिस आयुक्तांना याबाबत कल्पना देऊनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

कायदा सर्वांना समान आहे तर सामनाच्या संपादकावर वर देखील गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी फरांदे यांनी केली. त्याचप्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते समोरासमोर भिडले.

त्यात दगडफेकीत भाजप कार्यालयाचे नुकसान झाले. दगडफेक करणाऱ्यांना अभय दिले जात असून त्यांना अटक केलेली नाही. त्यांचे मुख्यमंत्री अभिनंदन करत आहेत. त्यामुळे पोलिसांना हाताशी धरून राजकारण होत असल्याचाही आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com