
सुरगाणा |प्रतिनिधी| Surgana
तालुक्यातील बिवळ येथे सख्या चुलत दीराने कुर्हाडीचे घाव घालून भावजयीची निघृण हत्या करून संशयित आरोपी फरार झाला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चंदर गावंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी अकरा वाजेच्या दरम्यान मयत यशोदा लक्ष्मण गावंडे (वय 26) हि विवाहिता राहत्या घरी स्वयपांक करीत असतांना त्याच वेळी तेथे संशयित आरोपी सख्या चुलत दीर रमेश परशराम गावंडे हा हातात कुर्हाड घेऊन आला. त्याने डोक्यावर, मानेवर मागील बाजूस कुर्हाडीने सपासप चार वार, घाव घालत निघृण हत्या केली.
कुर्हाडीने खोलवर घाव घातल्याने विवाहीतेचा जागेवरच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता आरोपीच्या चपला, गुन्ह्यात वापरलेली कुर्हाड ताब्यात घेत पंचनामा केला आहे. विवाहितेस एक दोन महिन्याचे अपत्य आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. संशयित आरोपी फरार झाला असून पोलिस निरीक्षक संदीप कोळी कसून तपास करीत आहेत.