नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी सप्ताह

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी सप्ताह

निफाड। प्रतिनिधी Niphad

नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar) येथील पक्षी अभयारण्यात (Bird sanctuaries) 5 ते 12 नोव्हेंबर पर्यंत पक्षी सप्ताह (Bird week) साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) वन्यजीव विभागाच्या (Department of Wildlife) वतीने नांदूरमध्यमेश्वर वनपरिक्षेत्रात हा सप्ताह दरवर्षी साजरा करण्यात येतो.

5 नोव्हेंबर रोजी अरण्यमहर्षी मारूती चितमपल्ली (Aranya Maharshi Maruti Chitampally) यांच्या जन्मदिनी या सप्ताहाचे आयोजन केले जाते. नाशिक (nashik) येथील वावरे महाविद्यालयाचे विद्यार्थी (students) स्थानिक युवकांना पक्षी निरीक्षण तसेच मार्गदर्शन (Guidance), समुह चर्चा (Group discussion) आदी उपक्रम राबविण्यात आले. खानगावथडी, चापडगाव, करंजगाव येथील ग्रामपंचायत समिती (grampanchayat samiti) सदस्य व नागरिक यांचेशी वन्यजीव व पक्षी संवर्धन (Wildlife and bird conservation) याबाबत बैठक घेऊन संपर्क अभियान राबविण्यात आले.

तर म्हाळसाकोरे (Mhalasakore) येथील आरूढ विद्यालयात वेटलॅड मित्र संघ, पक्षीमित्र, इको संस्था यांचे स्वयंसेवक यांनी पक्षी अभयारण्य परिसरात जावून स्वच्छता मोहिम (Sanitation campaign) राबविली. या पक्षी सप्ताहाची सांगता 12 नोव्हेंबर रोजी चापडगाव कॅम्पस येथे करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ता उगावकर यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि स्थानिक नागरिकांना नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव पक्षी अभयारण्य क्षेत्रात वन्यजीव पक्षी संवर्धन,

पर्यावरण संरक्षण (Environmental protection) याबाबत पुढाकार घेऊन रामसर स्थळाचा दर्जा अबाधित टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले. यावेळी ज्येष्ठ पक्षीमित्र मधूकर जगताप, अनिल माळी, अनंत सरोदे, विनोद पाटील, प्रा.संजय सावळे, डॉ.उत्तम डेर्ले आदी प्रमुखांचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनगावकर, सहाय्यक वनसंरक्षक विक्रम आहिरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनपरिमंडळ अधिकारी प्रितेश सरोदे, वनरक्षक संदिप काळे, आशा वानखेडे, गंगाधर आघाव, प्रमोद मोगल, सुनील जाधव, संजिव गायकवाड, प्रमोद दराडे, विलास गारे, डी.डी. फापाळे आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com