बर्ड फ्लू; पशुसंवर्धन विभागा मार्फत सतर्कता

बर्ड फ्लू; पशुसंवर्धन विभागा मार्फत सतर्कता

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

भारतातील काही भागात आलेल्या बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हयातील पशुसंवर्धन विभागामार्फत सतर्कता बाळगत विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्हयातील जलाशयावर स्थलांतरीत होणाऱ्या पक्षी व पाळीव पक्ष्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. लसर्व तालुक्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.

भारतातील राजस्थान , हिमाचल प्रदेशनंतर मध्यप्रदेशामध्ये बर्ड फ्लू ने थैमान घातले असून पक्षांचा मृत्यू झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही सतर्कता बाळगण्यात येत आहे.
करोना संकटाशी सामान सुरू असताना देशातील विविध राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे संकट ओढविले आहे. आतापर्यंत हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्येप्रदेश, राज्यस्थान व केरळमध्ये बर्ड फ्लूने शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संसर्गग्रस्त भागातील कोंबडया व बदकांची कत्तल केली जात आहे.

बर्ड फ्लूचा वेगाने होणार प्रसार रोखण्यासाठी पशुसवंर्धन विभागानेही पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. जिल्हा पशुसवंर्धन विभागाने कुक्कुट पक्षी,वन्य पक्षी , स्थलांतरीत पक्षी यांच्यात बर्ड फ्लूची लक्षणे दिसल्यास याबाबत त्वरीत माहिती देऊन रोग अन्वेषण विभाग या संस्थेशी संपर्क साधावा, अशा सूचना पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या वर्षीच्या बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रमानुसार क्लोअंकल व ट्रॅकयल स्वब या सिरम सॅम्पल संकलित करुन प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे. नियोजन व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हास्तरावर दक्षता पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नाशिक जिल्हयात ज्या-ज्या ठिकाणच्या जलाशयात स्थलांतरीत पक्षी येतात त्या ठिकाणच्या पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांना दररोज गावोगावी सर्वे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हयात सद्यपरिस्थतीती बर्ड फ्लू बाबतचा उद्रेक व लागण झाली नसल्याचे डॉ. गर्जे यांनी सांगितले.

जिल्हयातील सर्व पोल्ट्री फार्म चालकांनी पक्षांच्या आरोग्यासाठी मुलभूत स्वच्छता विषयक अटींचे पालन करावे. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जैवसुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, खाद्य वाहतूकी दरम्यान काळजी घ्यावी, पोल्ट्री फार्मवर जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यातअशा सूचना देखील पोल्ट्री धारकांना देण्यात आलेल्या आहे.

शेतकरी व पशुपालकांनी बर्ड फ्लू रोगाची माहिती देऊन लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकिय दवाखान्याशी संपर्क साधावा. पशुवैद्यकिय सेवकांनी आठवडा बाजारात विशेष सर्वेक्षण मोहिम राबवावी, संशयित क्षेत्रावरुन पक्षाची वाहतूक ने आण पूर्ण बंद करावी, पोल्ट्री फार्मवर आवश्यकतेनुसार खबरदारी घेण्यात यावी, प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने धुण्याच्या सोडयाच्या ( सोडियम काबोर्नेट ) द्रावणाने कोंबडयांचे खुराडे,गुरांचे गोठे,गावातील गटारे,नाले,पशुपक्षांचा वावर असलेल्या भिंती व जमिनीवर फवारणी करावी. रोगनमुने प्रयोगशाळेत पाठवावे. पाहुणे पक्षी भेट देतात त्या ठिकाणी सर्वेक्षण मोहिम राबवावी. बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर सर्व तालुक्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे.

- डॉ. विष्णू गर्जे (जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी, जिल्हा परिषद)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com