जैव चिकित्सा कचरा रस्त्यावर

जैव चिकित्सा कचरा रस्त्यावर

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

शहरालगत असलेल्या गंगाधरी ग्रामपंचायत हद्दीत जैव चिकित्सा कचरा (Biomedical waste) बायोमेडिकल वेस्ट (Biomedical waste) राष्ट्रीय महामार्गालगत बेजबाबदारपणे फेकून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ओमायक्रॉन (omicron) व करोना (corona) बाधित रूग्णसंख्येत वाढ होत असतांना जैव चिकित्सा कचरा रस्त्यावर फेकून दिला जात असल्याने आरोग्याची मोठी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गंगाधरी ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) कडेला जैव चिकित्सा कचरा बायोमेडिकल वेस्ट यामध्ये वापर झालेल्या सिरीज सलाईनच्या (Series Saline) बाटल्या तसेच औषधाची खोके आदी साहित्य फेकून दिल्याचे आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) उपजिल्हाध्यक्ष विशाल वडगुले (Deputy District President Vishal Wadgule) यांना सकाळी निदर्शनास आले. त्यांनी कचर्‍याचे फोटो काढून समाज माध्यमांवर टाकून समाजातील शिक्षीत लोकांतर्फे अशा बेजबाबदार पद्धतीने वागणे चुकीचे असल्याचे मत मांडल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

शहरातील काही नागरिकांनी घटनास्थळी भेट दिली असता त्याठिकाणी असलेल्या बायोमेडिकल कचर्‍याची विल्हेवाट अज्ञात व्यक्तीने लावून दिली असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रात (maharashtra) ओमायक्रॉन व करोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत असतांना अशा प्रकारे दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये वापरून झालेल्या जैव चिकित्सा कचर्‍याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावणे गरजेचे असतांना बेजबाबदारपणे रस्त्याच्या कडेला फेकून देणे अतिशय धोकादायक ठरू शकणार आहे.

त्यामुळे जैव चिकित्सा कचरा बेजबाबदारपणे फेकणार्‍यांविरूध्द प्रशासनाने कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व रूग्णालय चालकांना कचर्‍याचे योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात सुचना करण्यात याव्यात, अशी मागणी शहरातील नागरीकांतर्फे केली जात आहे.

जैव चिकित्सा कचरा बायोमेडिकल वेस्ट कायदा अंतर्गत जे कोणी असा प्रकार केला असेल अशा संबंधित डॉक्टरांवर उद्या नोटीस जारी करण्यात येणार आहे. जैव चिकित्सा कचरा उघड्यावर फेकणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असा प्रकार करणार्‍यांविरूध्द कारवाई केली जाईल.

डॉ. संतोष जगताप, आरोग्याधिकारी नांदगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com