
नाशिक । प्रतिनिधी Nashik
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Late Balasaheb Thackeray ) यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शित केलेली त्यांची बायोग्राफी संग्रही ठेवण्याजोगी आहे. बायोग्राफी पुढील पिढीस निश्चितच आदर्शवत आणि मार्गदर्शक ठरेल, असे खा. गोडसे यांनी यावेळी केले.
खा. गोडसे यांच्या पुढाकाराने गंगापूर रोडवरील कै. रावसाहेब थोरात सभागृहाजवळील मैदानावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोग्राफीचे प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. सोमवारी दिवसभर सर्वांसाठीच हे प्रदर्शन खुले असणार असून, रविवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, आर. डी. धोगडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मी ताठे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश म्हस्के, सदाभाऊ नवले, दिगंबर नाडे, नितीन साळवे, मामा ठाकरे, शिवाजी भोर, योगेश बेलदार, सचिन भोसले, सुजाता खरे, वैशाली दाणी आदी उपस्थित होते.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोग्राफी प्रदर्शनात स्केचने रेखाटलेले 800 फूट लांब आणि पाच फूट उंचीचे विविध घटनांमधील फोटोंची ठेवण करण्यात आलेली आहे. दर्शनी भागात झेंडूच्या फुलांचे खांब तयार करून त्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य फोटो सर्वांसाठीच आकर्षण ठरत आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर मान्यवरांनी प्रदर्शनातील बायोग्राफी बघण्याचा आंनद लुटला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मापासून तर शेवटपर्यंतच्या कारकिर्दीचे रेखाटलेले क्षण, देशभरातील मान्यंवरांच्या सोबतचे त्यांचे स्केचने रेखाटलेले फोटो पाहून सर्वच मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.