बायोडिझेल विक्रीचा अड्डा उध्वस्त

पोलीस पथकांतर्फे कारवाई; 13.50 लाखाचा मुद्देमाल जप्त
बायोडिझेल विक्रीचा अड्डा उध्वस्त

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

पत्र्याच्या शेडमध्ये बायोडिझेलची (biodiesel) इंधन (fuel) म्हणून होत असलेल्या विक्रीचा अड्डा अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी (Upper Superintendent of Police Chandrakant Khandvi) व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांनी छापा टाकत उध्वस्त केला. यावेळी बायोडिझेलसह विक्री साहित्य, दोन मालट्रक असा सुमारे 13 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात येवून चौघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) म्हाळदे शिवारात ही कारवाई केली गेली.

महामार्गावर यापुर्वीही विशेष पोलीस महानिरीक्षक टी.बी. शेखर तसेच जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या विशेष पथकांतर्फे छापे टाकण्यात येवून बायोडिझेल विक्रीचे अवैध अड्डे उध्वस्त करण्यात येवून लाखो रूपयांचे बायोडिझेल व साहित्य जप्त करण्यात आले होते.

पोलिसांतर्फे सातत्याने कारवाई होत असली तरी इंधन म्हणून बायोडिझेल विक्री संबंधितांतर्फे केलीच जात असल्याचे या कारवाईवरून पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. बायोडिझेल विक्रेते (Biodiesel sellers) गुन्हा दाखल होवून सुध्दा विक्री बंद करत नसल्याने त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागणी येथे केली जात आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील म्हाळदे शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये इंधन म्हणून बायोडिझेलची अवैध विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळताच अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेस कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या अड्ड्यावर आज छापा टाकण्यात येवून शेड मालक नदीम खान रशीद खान यांच्यासह विक्रेता समसुद्दीन कलीमोद्दीन व डिझेल भरण्यासाठी आलेल्या दोन ट्रक चालकांना पोलिसांनी ताब्यात घेत 2200 लिटर बायोडिझेलसदृष्ट द्रव्य, नोझल मशिन, 60 टाक्या, 2 ट्रक असा मुद्देमाल जप्त केला. पवारवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com