
नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक शहरातील अनेक घरांमधील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या रौलेट किंगला अटक करण्यात आली आहे.कैलाश शाहा (Kailash Shaha) असे या रौलेट किंगचे नाव आहे. त्यास काल (दि २०) रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे...(bingo roulette king arrested by rural police nashik)
याबाबतची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Nashik SP Sachin Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे (Pimpalgaon Baswant Police Station) येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रौलेटच्या जाळ्यात अनेक सर्वसामान्य व्यक्ती अडकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.
पिंपळगाव शहरात बिंगो रौलेट जुगाराचे नावाखाली तरुणांची लाखोंची आर्थिक फसवणुक करणा-या कैलास शहा याच्याविरोधात पिंपळगाव पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. बिंगो रौलेट जुगार खेळविणारा आरोपी कैलास शहा याच्याविरुध्द नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली यापूर्वीही कारवाई करण्यात आलेली आहे.
नाशिक जिल्हयातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे (Pimpalgaon Baswant Police Station) हद्दीत याची दुशी, ता.निफाड येथील फिर्यादी रामराव बचन रसाळ(, वय 37. ह.मु. पिंपळगाव, ता. निफाड यांस संशयित आरोपी नामे कैलास जोगेंदप्रसाद शहा (वय 32, रा फ्लॅट नं.1, चिंतामणी अपार्टमेंट, दत्तचौक, गंगापुर रोड नाशिक, व प्रितम राजेंद्र गोसावी, रा. गोसावीवाडा, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड यांनी संगनमत करून यातील फिर्यादींचा विश्वास संपादन करून आरोपींनी फिर्यादीचे मोबाईल कमांकावर बिंगो रौलेट फनगेम नावाचे अॅप्लिकेशनची लिंक सेंड केली.
ती डाऊनलोड करून ऑनलाईन बिंगो रोलेट जुगार खेळण्यासाठी लागणारा मेल आय.डी. व पासवर्ड पाठवुन 01 पॉईंटला 36 रूपये या दराने पैसे मिळतील असे सांगुन फिर्यादीस आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा होण्यासाठी बिंगो रौलेट जुगार खेळण्यास भाग पाडले.
या अमिषाला बळी पाडून फिर्यादींची एकुण 45 लाख 44 हजार 315 रुपयांची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात भादवि कलम 420,409 120 (ब) 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयात संशयित कैलास जोगेंद्रप्रसाद शहा यास अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयाने 03 दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सपकाळे हे वरील गुन्हयाचा पुढील तपास करीत आहे.
संशयित शहा याच्यावर जिल्ह्यातील दहा १२ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल म्र्यात आला आहे. बिंगो रौलेट जुगार हे तरुणांना लाखोंचा गंडा घालुन आर्थिक फसवणुकीचे साधन बनलेले आहे. ऑनलाईन बिंगो रौलेट जुगारामुळे झालेल्या फसवणुकीतुन तरुणांचे आणि विद्यार्थी यांचे मोठे आर्थिक व कौटुंबिक नुकसान होत असुन आत्महत्याही होत आहे.
तसेच काही तरुण जिंकण्याच्या अमिषाने कर्जबाजारी होत असून जिल्हयातील ज्या तरुण वर्गाची या ऑनलाईन बिंगो रौलेट जुगारात आर्थिक फसवणुक झाली आहे व ज्यांना यामुळे आपली घरे, दुकानं, मोटर वाहने, स्थिर / स्थावर मालमत्ता विक्री करावी लागली आहे.
अशा जास्तीत जास्त तरुणांनी नजीकचे पोलीस ठाण्यांमध्ये सकार देणे बाबतचे आवाहन नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.