दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; दहा मोटरसायकल जप्त

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; दहा मोटरसायकल जप्त

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

गेल्या काही दिवसापासून नाशिक शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकींच्या चोऱ्या होत आहेत. दुचाकी चोरणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknaware) यांनी मोटर सायकल चोरी प्रतिबंध विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते...

त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त विजय खरात (Vijay Kharat) यांनी परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस स्टेशनमधून 10 पोलीस अंमलदार व एक अधिकारी यांची निवड करून पथक स्थापन केले.

नाशिकरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या.

या अनुषंगाने नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे अंमलदार व मोटार सायकल चोरी प्रतिबंध पथकातील अंमलदार यांनी संयुक्त गोपनीय माहिती काढून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक (Arrested) केली. त्यांच्याकडून दहा मोटारसायकली व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; दहा मोटरसायकल जप्त
दारणा धरणातून 'इतक्या' क्युसेसचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिकरोड पोलिसांनी (Nashikroad Police) केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; दहा मोटरसायकल जप्त
करंजवण धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली संशयित आरोपी अजय प्रवीण दहेकर (२२, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) अमोल बाळू इंगळे (२३, रा. म्हाडा कॉलनी, पाथर्डी फाटा, अंबड) यांना विधी संघर्षित बालकासह कुकरीसारखे हत्यार जवळ बाळगताना पकडले.

त्यानंतर तपासात आरोपीचा साथीदार विजय प्रल्हाद आव्हाड (२०, गणेश चौक, सिडको) यास ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून दोन मोबाईल, आठ मोटारसायकली असा एकूण दोन लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; दहा मोटरसायकल जप्त
...अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

त्याचप्रमाणे उपनगर पोलीस स्टेशनकडील गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाप्रमाणे माहिती काढून आरोपी निलेश बापू बेलदार (२१, रा. देवळाली गाव) याला अटक करण्यात आली.

त्याच्याकडून एकूण दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असेही ते म्हणाले. या सर्वांनी नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाड्या चोरल्या होत्या. हे सर्व गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; दहा मोटरसायकल जप्त
Special Podcast : तरुणांसाठी अर्थक्षेत्रातील संधी (भाग ३)

ही कामगिरी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश नायदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अनिल शिंदे, मनोहर शिंदे, विष्णू गोसावी, अविनाश देवरे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे, विनोद लखन, शरद झोले, किरण गायकवाड, स्वप्निल जुन्द्रे, अजय देशमुख, अनंत महाले, तुकाराम जाधव, मुश्रीफ शेख यांनी केली. या सर्वांचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com