
सिन्नर। प्रतिनिधी Sinnar
सिन्नर-घोटी महामार्गावर हरसूले फाटा शिवारात आज (दि.21) सायंकाळच्या सुमारास अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.
शहापूर तालुक्यातील खर्डी येथील संतोष भोईर (57) व अरविंद लहू विसे (58) हे मोटरसायकल( क्र. एम. एच. 04/ ए. व्ही. 6720) घोटीकडून सिन्नरकडे येत असताना हरसूले फाटा शिवारात समोरून येणारे अवजड वाहनाने ( क्र. टीएन। 37/ डीवाय 9523) दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
यात संतोष भोईर हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. तर अरविंद विसे हे किरकोळ जखमी झाले. संतोष भोईर यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळीधाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.अधिक तपास महामार्ग पोलीस उपनिरीक्षक एस. डी. गायकवाड करत आहेत.