नाशिकरोड : दत्त मंदिर चौकात दुध टँकरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार

नाशिकरोड : दत्त मंदिर चौकात दुध टँकरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार

नाशिकरोड | प्रतिनिधी

नाशिक-पुणे महामार्गावरील मंदिर चौकात दुधाच्या टँकरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली...

नाशिक रोड येथील दत्त मंदिर चौक येथे सिग्नल सुटल्याने पाठीमागून भरधाव वेगाने जाणाऱ्या दुधाच्या टँकरने दुचाकी चालकाला धडक दिली.

या भीषण अपघातात विनायक गणपत नागरे (वय45) हे जागीच ठार झाले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com