जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; प्रारूप मतदार यादीबाबत मोठी अपडेट

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; प्रारूप मतदार यादीबाबत मोठी अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) पत्रानुसार नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समिती (Panchayat Samiti) सार्वत्रिक निवडणुकांकरिता (Election) सुधारीत मतदार यादी (Voters List) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे...

त्‍यानुसार 20 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी (Draft Voter List) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या यादीवर हरकती (Objection) असल्यास दि. 25 जुलै 2022 पर्यंत दाखल करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; प्रारूप मतदार यादीबाबत मोठी अपडेट
...अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, नाशिक जिल्हा परिषद पंचायत समिती – 2022 सार्वत्रिक निवडणूकीकरिता सर्व तहसील कार्यालये व पंचायत समिती कार्यालय येथे प्रारूप मतदार यादी सर्व नागरिकांना अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; प्रारूप मतदार यादीबाबत मोठी अपडेट
हा तर कानुनी लोचा...; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया

या यादीवर हरकती असल्यास त्या संबंधित तहसीलदार यांच्याकडे दि. 25 जुलैपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com