क्रीडा विभागाला पुरेपूर निधी

क्रीडा विभागाला पुरेपूर निधी
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

यंदाच्या वर्षी क्रीडा विभागाला (Sports department) १०० टक्के निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षी राहून गेलेले कार्यक्रम उत्साहात घेण्यात येतील अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक (Ravindra Naik) यांनी दिली आहे....

करोनामुळे (Corona) राज्य सरकारने (Maharashtra State Government) सर्वच खर्चवर मर्यादा आणलेली आहे. त्यानुसार, क्रीडा विभागाला मागील वर्षी केवळ तीस टक्के निधी देण्यात आला होता. यंदा मात्र क्रीडा विभागाला राज्य सरकारचा शंभर टक्के निधी मिळणार असल्याने जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला यंदा भरपूर वाव आहे.

राज्य सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक व क्रीडा विभागांच्या खर्चावर मर्यादा आणल्या होत्या. त्यामुळे राज्यातील अनेक स्पर्धा, पारितोषिक वितरण समारंभ, तसेच विविध प्रकारचे अनुदान यावर मर्यादा आल्या होत्या.

क्रीडा विभागाच्या वतीने दर वर्षी गाव, तालुका, राज्य पातळीवरील मैदानांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचप्रमाणे जिल्हा, तालुका, राज्य पातळीवर नैपुण्य दाखविणाऱ्या खेळाडूंना विविध प्रकारचे अनुदान दिले जाते.

गावात असलेल्या व्यायामशाळांच्या विकासासाठी क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी भरघोस मदत देण्याची तरतूद वर्षीपासून करोनाच्या निर्मूलनासाठी जास्त खर्च होत असल्याने इतर खर्च कमी करण्यात आला होता. यंदा मात्र अद्याप अनुदान कमी करण्याच्या यादीत क्रीडा विभागाचा समावेश करण्यात आलेला नाही.

दर वर्षी व्यायामशाळांना अनुदान दिले जाते. काही वेळा क्रीडा साहित्य खरेदी करून दिले जाते. त्याचप्रमाणे मैदानांच्या दुरुस्तीसाठी, विविध योजनांसाठी क्रीडा विभागाकडून अनुदान दिले जाते. यंदा मात्र हे सर्व अनुदान शंभर टक्के मिळणार आहे.

राज्य सरकारपुढे सध्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे मागील वर्षी अनुदानात तीस टक्के कपात केली होती . यंदा अद्यापपर्यंत निधी कपातीचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

- रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com