कांदा बाजार भावात मोठी घसरण; उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

कांदा बाजार भावात मोठी घसरण; उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

कांदा बाजार भावातील (Onion market price) घसरण थांबविण्यासाठी शासन स्तरावर तातडीने उपाययोजना कराव्या,

अशी मागणी निफाड शिवसेना तालुका प्रकाश पाटील (Niphad Shiv Sena Taluka Prakash Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्याकडे निवेदनाद्वारे (memorandum) केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा (onion) पिकविणारे राज्य असुन भारतातील एकुण कांदा उत्पादनात (Onion production) महाराष्ट्राचा ३३ टक्के वाटा आहे. महाराष्ट्रातील सरासरी उत्पादन इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. शिवाय येथील कांद्याची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नाशिक (nashik), पुणे (pune), सोलापुर (solapur), सातारा (satara), अहमदनगर, धुळे, बुलढाणा आणि जळगांव इ. जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असुन महाराष्ट्रातील एकुण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा २९ टक्के वाटा आहे.

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात (nashik district) कांदा ह्या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी लासलगांव बाजार समिती (Lasalgaon Market Committee) आशिया खंडात (Asia) प्रसिध्द अशी बाजारपेठ असुन येथे विक्रीस येणार्याल एकुण आवकपैकी ८५ ते ९० टक्के आवक ही कांदा ह्या शेती मालाची असते. सर्व साधारणपणे हा कांदा नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार व औरंगाबाद या ०६ जिल्ह्यातुन विक्रीस येतो. आलेल्या कांदा आवके पैकी ७० ते ८० टक्के कांदा हा निर्यात योग्य असतो.

नाशिक जिल्ह्यातील लासलगांवसह (lasalgaon) इतर सर्व बाजार समित्या ह्या प्रायमरी मार्केट असल्याने येथे फक्त शेतकऱ्याचाच शेतीमाल विक्रीस येतो. सद्य स्थितीत येथील बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांवर दररोज साधारणतः ५० ते ५५ हजार क्विंटललाल (लेट खरीप) कांद्याची कमीत कमी ४०० रुपये, जास्तीत जास्त १,३९० रुपये व सर्वसाधारण ९५० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे विक्री होत आहे. गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत कांद्याच्या सर्वसाधारण भावात ३०० ते ३५० प्रति क्विंटलने घट झालेली आहे.

चालु वर्षी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर या जिल्ह्यांसह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक व पश्चिआम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी कमी होत असुन दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे. मागणी अभावी कांदा बाजारभावात अशीच घसरण सुरू राहील्यास केंद्र व राज्य शासनाच्या ध्येय-धोरणांबाबत शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण होऊन कोणत्याही क्षणी त्यांचेकडुन रस्ता रोको किंवा आंदोलन होण्याची शक्यता आहे.

तरी वरील सर्व बाबींचा विचार करून सध्या बाजार समित्यांमध्ये विक्रीस येत असलेल्या लाल (लेट खरीप) कांद्याच्या दरातील घसरण थांबविण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या,अशी मागणी शिवसेनेचे निफाड तालुका प्रमुख प्रकाश पाटील, कांदा व्यापारी प्रविण कदम, सामाजिक कार्यकर्ते विकास कोल्हे, प्रमोद पाटील, संदिप कोल्हे, संदिप पवार, गणेश कुलकर्णी, केशवराव जाधव ,फिरोज मोमीन, बापूसाहेब मोकाटे, संदीप पवार, शोएब शेख आदीच्या शिष्टमंडळांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय़ आरोग्य मंत्री भारती पवार यांची मनमाड येथे समक्ष भेट घेत तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com