विकेंड लॉकडाऊन नंतर नाशकात मोठी गर्दी

मुख्य बाजार पेठात वर्दळ
विकेंड लॉकडाऊन नंतर नाशकात मोठी गर्दी

नाशिक | Nashik

दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊन नंतर आजपासून मिनी लॉक डाऊनची सुरुवात होताच भाजीपाला तसेच किराणामाल खरेदी करण्यासाठी शहरात नागरिकांनी गर्दी केली.

दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठा असलेली मेनरोड, शालिमार, दुधबाजार आदी परिसरात महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर बाहेर पडला आहे. यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या फज्जा उडताना दिसत आहे. काही ठिकाणी पोलिस कारवाई करीत आहे, मात्र गर्दीला कसे आळा घालायचा याबाबत अद्याप संभ्रम आहे.

एकीकडे करोनाचा कहर सुरू असतांना अद्यापही नाशिककर गर्दी करतांना दिलेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने यावर कडक निर्बंध लादल्याशिवाय कोरोनाचा अटकाव करता येणार नाही. नाशिककरांनी देखील प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. परंतु विकेंड लॉकडाऊन संपलं आणि लोक घराबाहेर पडले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com