गाळणे किल्ल्यावर ना. भुसेंची हेरिटेज वॉक

गाळणे किल्ल्यावर ना. भुसेंची हेरिटेज वॉक

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुका प्रशासनाच्या वतीने गाळणे किल्ल्यावर (Galne Fort) हॅरिटेज वॉकचे (Heritage Walk) आयोजन करण्यात आले.

यावेळी किल्ल्याच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत 400 फूट तिरंगा ध्वजाची रॅली (Tricolor rally) काढण्यात येऊन ना. दादाजी भुसे (Minister Dada Bhuse) यांच्या हस्ते गाळणे किल्ल्यावर तिरंगा पुजनाने हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ना. भुसे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण (tree plantation) करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आजपासून राज्यात हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. सर्व नागरिकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होवून घरोघर राष्ट्रध्वज (national flag) उभारावा. तालुका प्रशासन, मनपा प्रशासन (municipality administration), लोकप्रतिनिधी,

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती (gram panchayat), शाळा (school), महाविद्यालये (college) व सर्व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन शासनाच्या निर्देशांचे तसेच ध्वज संहितेचे परिपूर्ण पालन करावे असे आवाहन ना.भुसे यांनी केले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे (Upper Collector Maya Patole), अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी (Upper Superintendent of Police Chandrakant Khandvi), प्रांत डॉ. विजयानंद शर्मा (Province Dr Vijayanand Sharma), उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे (Sub Divisional Agriculture Officer Dilip Deore), तहसिलदार चंद्रजित राजपूत (Tehsildar Chandrajit Rajput),

पं.स. गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, गाळणे सरपंच रुपाली वाणी, उपसरपंच विजय गांगुर्डे, किल्ला व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत वाणी तसेच विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचार्‍यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com