भुसेंची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी; समर्थक व कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुसेंची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी; समर्थक व कार्यकर्त्यांचा जल्लोष

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) आज झालेल्या विस्तारात मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाचे (Malegaon Outer Assembly Constituency) आमदार (MLA), माजीमंत्री दादा भुसे (Former Minister Dada Bhuse) यांनी पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ (Oath of Cabinet Ministership) घेतली.

भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळताच शहर, तालुक्यात समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. मोसमपूल चौकात कार्यकर्त्यांनी मिरवणुकीने येत फटाक्यांची आतषबाजी करत नागरिकांना पेढे वाटून आपला आनंद द्विगुणीत केला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray), धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

शिवसेनेत एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केलेल्या उठावात माजीमंत्री दादाजी भुसे (Former Minister Dadaji Bhuse) यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. धर्मवीरआनंद दिघे यांना शिंदे व भुसे आपले गुरू मानतात. शिंदे यांच्याबरोबर भुसे यांचे अत्यंत घनिष्ट संबंध असल्यामुळेच नाशिकला (nashik) होणारी उत्तर महाराष्ट्राची महसूल विभागाची (Department of Revenue) आढावा बैठक मालेगावी घेत मुखमंत्री शिंदे यांनी भुसेंच्या योगदानाचे महत्व अधोरेखीत केले होते.

तसेच शिंदे यांचा मालेगावी विराट जनसमुदायाच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार करत भुसे यांनी या उठावानंतर देखील आपले सामर्थ्य जैसे थे असल्याची चुणूक दाखवून दिली होती. भुसे आपले बंधू असून त्यांच्या पाठिशी आपण भक्कमपणे उभे आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Shinde) यांनी सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करतांना दिल्याने पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांच्या यादीत भुसे यांचा समावेश राहणार असल्याचा संकेत मिळाला होता.

अपेक्षेनुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी भुसे यांना पुन्हा मिळाल्याने शहर, तालुक्यातील समर्थक कार्यकर्ते उल्हासीत झाले आहेत. युती शासनात सहकार व ग्रामविकास राज्यमंत्रीपदी वणी लागलेल्या भुसेंनी विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना कृषिमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रीपदावर बढती मिळाली होती.

कृषिसारखे महत्वाचा विभाग मिळाल्याने शेतकरी हिताच्या विविध योजना राबवत या विभागास न्याय देण्याचा प्रयत्न भुसे यांनी केला होता. मालेगाव तालुक्यास देखील पाच विद्यालयांचा समावेश असलेल्या कृषि विज्ञान संकुलास मंजुरी आणत या संकुलांचे भुमीपूजन देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते त्यांनी करवून घेतले. शेतकरी हितासाठी हा महत्वाचा निर्णय भुसे यांनी घेतला होता. कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची पुन्हा वर्णी लागल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आज सकाळी भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच समर्थक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोषास प्रारंभ केला होता. मोसमपुलावर अभुतपूर्व आनंदोत्सव साजरा केला गेला. यावेळी माजी उपमहापौर नीलेश आहेर, जयराज बच्छाव, सुशांत गोसावी, यशपाल बागुल, रितेश गवळी, राहुल गायकवाड, सनी आहेर, बॉबी अहिरे, विशाल पवार, पवन पाटील, गणेश गोरे, विक्की चव्हाण, गौरव पाटील, निखील बुरड, काकाजी निकम, सजन सैंदाणे, नाना निकम, बिपीन रायते, उस्मान शेख, नितीन पवार आदिंसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com