पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

45 गावांमध्ये जलजीवन मिशन
पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

नांदुरी, मोहबारी । वार्ताहर

कळवण-सुरगाणा ( Kalwan- Surgana ) विधानसभा मतदारसंघातील सुमारे 45 गावांसाठी जलजीवन मिशन ( Jaljivan Mission )अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नळपाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा आमदार नितीन पवार ( MLA Nitin Pawar ) यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कळवण तालुक्यात आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील टंचाईग्रस्त गावासांठी पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. त्यामुळे वर्षभरातच या टंचाईग्रस्त गावांचा पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. यात प्रामुख्याने दरेगाववणी (84 लक्ष), कातळगाव (67 लक्ष), आभोणा (3 कोटी 50 लक्ष), चणकापूर (1 कोटी 04 लक्ष ), गांडोळमोख (22 लक्ष), तिर्‍हळ बु (40 लक्ष), बिलवाडी (33 लक्ष), देवळीवणी (1 कोटी 04 लक्ष), चिंचपाडा (43 लक्ष), जामलेवणी (77 लक्ष),

वडपाडा (94 लक्ष), सुकापुर ( 78 लक्ष), लिंगामे (65 लक्ष), भाकुर्डे, (42 लक्ष), कोसुर्डे (24 लक्ष), दळवट (1 कोटी 22 लक्ष), भांडणे (हा), (34लक्ष), शिवभांडणे (43 लक्ष), जिरवाडे(हा) (24 लक्ष), कुमसाडी (58 लक्ष), शेपुपाडा (52 लक्ष), कनाशी (3 कोटी 7 लक्ष), लखाणी (43 लक्ष), जयदर (78 लक्ष), खडकी (67 लक्ष), कोसवन (1 कोटी 57 लक्ष), प्रतापनगर (84 लक्ष), खर्डेदिगर (2 कोटी 33 लक्ष), मळगाव (92 लक्ष), पिंपळे (63 लक्ष), मोहबारी (94 लक्ष) धार्डेदिगर (88 लक्ष), नाळीद (77 लक्ष), गणोरे (2 कोटी ), दरेभणगी (85 लक्ष), पिळकोस (1 कोटी 13 लक्ष),

भादवन (50 लक्ष), गांगवन (56 लक्ष), जुनीबेज (1 कोटी 27 लक्ष), कुंडाणे (ओ) (93 लक्ष), नरूळ (1 कोटी 96 लक्ष), मुळाणेवणी (1 कोटी 14 लक्ष), कन्हेरवाडी (56 लक्ष), साकोरे (93 लक्ष) आदी सुमारे 45 गावातील पाणीपुरवठा योजनांनासाठी कोट्यावधी रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात सुमारे 45 गावातील पाणीपुरवठा योजनांचा भुमिपुजन सोहळा नुकताच पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ, जगन साबळे, मधुकर जाधव, ज्ञानदेव पवार, डी. एम गायकवाड, रमेश पवार, यशवंत पवार, विलास रौंदळ, सोमनाथ सोनवणे, सरपंच सुनिता पवार, उपसरपंच शंकर पवार, राजू पाटील, राजू पवार, राजेंद्र मोरे, राजेंद्र वेढणे, सुभाष राऊत, सोनिराम गांगुर्डे आदी विविध गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com