लघु पाटबंधारे योजनेच्या कामाचे भूमिपूजन

लघु पाटबंधारे योजनेच्या कामाचे भूमिपूजन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पेठ तालुक्यातील ( Peth Taluka ) कुळवंडी ( Kulvandi )येथील लघु पाटबंधारे योजने साठी तब्बल 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या धरणाचा दहा गावांना फायदा होणार असून, तालुक्याची सिंचन क्षमता 230 हेक्टरने वाढणार आहे. या प्रकल्पामुळे कुळवंडी शिवारातील गावांचा 20 वर्षांपासूनचा दुष्काळ संपणार असल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला.

लघु पाटबंधारे योजनेच्या या कामाचे भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपविभागीय जलसंधारण अधिकारी नारायाण डावरे, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळसे, सचिन खंबाईत यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी झिरवाळ म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला हरिभाऊ गिते यांची मदत होणार आहे. त्यांना कामाची पध्दत माहिती असल्याने प्रत्येक टेबलविषयी त्यांना इंथभूत माहिती आहे. त्यामुळे तत्वाला काम मार्गी लागते. त्यांच्याकडे एक काम दिले होते. त्यांनी आठ दिवसांत ते काम मार्गी लावले. त्यांच्यासारखा अधिकारी जिल्ह्याला लाभल्याने जिल्ह्याचा विकास निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुळवंडीचा या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यासह कृषी सिंचनासअठी जवळपास 69.26 दशलक्ष घनफूट क्षमता असलेला प्रकल्प मंजूर झाला आहे. यामुळे कुळवंडीसह घनशेतपाडा, हट्टीपाडा, नाईकपाडा, निमोणीपाडा, कडवईपाडा, बर्डापादा व गावंद येथील गावांना पाणी मिळेल. या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी झाले. आमदार नरहरी झिरवाळ हेच मतदारसंघाचे पाणदेव असल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, नगराध्यक्ष करण करवंदे, मनोहर चौधरी, गोकुळ झिरवाळ, गिरीश गावित, रामदास गवळी, हिरामण पवार, मोहन गावंडे, हनुमंत गवळी, गणेश गवळी आदी उपस्थित होते.

प्रकल्पाची माहिती

पाणलोट क्षेत्र : 4.95 चौरस किलो मीटर

साठवण क्षमता : 69.26 दशलक्ष घनफूट

सिंचन क्षमता : 230 हेक्टर

धरणाची उंची : 29.24 मीटर

धरणाची लांबी : 375 मीटर

सांडव्याची रुंदी : 56 मीटर

कालवा लांबी : 2 किलो मीटर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com