घोटी । वार्ताहर Ghoti

घोटी येथील मुंबई आग्रा महामार्गावर सिन्नर चौफुलीवर भव्य उड्डाणपुलाचे भूमिपूजन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

घोटी परिसरात सिन्नर चौफुलीवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलामुळे परिसरातील अपघातांना आळा बसणार आहे.तसेच शहराच्या विकासात व वैभवात भर पडणार आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

या उड्डाणपुलाच्या कामासाठी खासदार हेमंत गोडसे यांचा गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, माजी जि प सदस्य अँड संदीप गुळवे, पंचायत समिती सभापती जिजाबाई नाठे, सरपंच सचिन गोणके आदी उपस्थितीत भूमीपूजन झाले .खा. गोडसेंच्या उड्डाणपुलाला गतवर्षी मंजुरी मिळून निधी उपलब्ध झाल्याने या कामाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, उपतालुका प्रमुख कुलदीप चौधरी, राजाभाऊ नाठे, रमेश धांडे, विलास आडके, रमेश गायकर, माजी सरपंच संजय आरोटे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख बाळा गव्हाणे, रघुनाथ तोकडे, ज्ञानेश्वर लहाने, रामदास भोर, रमेश धांडे, संजय जाधव, केरु देवकर, राजाभाऊ नाठे, रामदास शेलार, अशोक सुरुडे, समाधान वारुंगसे, प स सदस्य अण्णा पवार, स्वाती कडू, नामदेव गाढवे, हनुमंता गायकवाड आदी उपस्थित होते.