सेंद्रीय खत प्रकल्पाचे भूमिपूजन

सेंद्रीय खत प्रकल्पाचे भूमिपूजन

त्र्यंबकेश्वर। प्रतिनिधी Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिल्या सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे Organic Fertilizer Project भूमिपूजन समारंभ साधू महंत यांच्या उपस्थितीत बुवाची वाडी (आंबोली)Buvachi wadi- Amboli येथे झाले.

यावेळी श्रीमंहंत दिनेशगिरी महाराज, महंत केशव पुरी महाराज, सागरानंद सरस्वती महाराज, महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज सरस्वती, दिगंबर धनंजय गिरी महाराज पंच दशनाम जुना आखाडा महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज हे या पूजेत सामील झाले होते. यावेळी शेतकरी उपस्थित होते. दहा हजाराच्यावर कंपनीचे सभासद करण्यात आले आहेत.

शेतकर्‍यांचे प्रश्न, इंधन समस्या वेस्ट कचर्‍याचे बेस्ट कचर्‍यात रूपांतर हे प्रश्न सोडवण्साठी पंचायती आखाडाने पुढाकार घेत श्रीनिरंजन फार्मर्स प्रोड्युसर कंंपनीने उपक्रम राबविला आहे, असे एनसीएल कंंपनीचे अधिकारी कार्तिक राहुल यांनी सांगितले स्वामी सागरानंद सरस्वती यांनी कंपनीला मार्गदर्शन केले.

समाधान बोडके यांनी यांनी शेतकरी स्वयंपूर्ण होण्यासाठी परिपूर्ण आहे, असे संांगतले. नगरसेवक स्वप्निल शेलार यांनी शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या पाहता असे उपक्रम रोजगार मिळवून देतील असे सांगत त्र्यंबक नगरपालिका वेस्टीज कंपनीला देण्यास तयार आहे सांगितले.तर आभार अरुण मेढे यांनी मानले .

यावेळी आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती महाराज तसेच विविध आखाड्याचे साधू महंत कार्यकर्ते भास्कर खोसकर ,स्वाती पवार, शारदा तुंगार, कंपनीचे संचालक मंडळ, ग्राम उद्योजक इत्यादी उपस्थित होते. ग्राम उद्योजकांनी मोठे परिश्रम सभासद करणे व कार्यक्रमासाठी घेतले. पवन गुंबाडे ,पवन चव्हाण, दीपक मींदे, बाळू डगळे .सुनील बोडके ,संजय चव्हाण , ज्ञानेश्वर मेढे आदींनी संयोजन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com