व्यायामशाळा इमारत बांधकामाचे भूमिपूजन

व्यायामशाळा इमारत बांधकामाचे भूमिपूजन

ननाशी । वार्ताहर Nanashi-Dindori

दिंडोरी (Dindori) तालुक्यातील ननाशी (Nanashi) येथे व्यायामशाळा (GYM) इमारत बांधकामाचे भूमिपूजन (Bhumipujan) गोकुळ झिरवाळ आणि जि. प. सदस्य अशोकराव टोंगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्थानिक युवकांची बर्‍याच दिवसांपासून व्यायामशाळेची मागणी होती. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Deputy Speaker of the Assembly Narhari Zhirwal )आणि जिल्हा परिषद सदस्य अशोकराव टोंगारे यांच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा विभागाच्या (District Sports Department) वतीने ननाशी येथे व्यायामशाळा इमारत बांधकाम करण्यासाठी सात लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

गावातील युवकांना या व्यायामशाळेचा मोठा फायदा होणार आहे. या कार्यक्रमात गोकुळ झिरवाळ व जि. प. सदस्य अशोकराव टोंगारे, पं.स. सदस्य हिरामण महाले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच दत्ता शिंगाडे, उपसरपंच शेखर देशमुख, ग्रा.पं. सदस्य चिंतामण शेखरे, पंढरीनाथ वाघमारे, दत्ता गांगोडे, हिरामण गांगोडे,

पार्वतीबाई डंबाळे, शांता दिसोडे, जयश्री जाधव, ताराबाई चौधरी, ग्रामविकास अधिकारी ठाकरे, धोंडाळपाडाचे सरपंच सुरेश पवार, बाडगीचापाड्याचे माजी सरपंच सोमनाथ हिंडे, कैलास राऊत, संदीप शिंगाडे, प्रकाश शिंगाडे, अजय गांगोडे, अंकुश झनकर, रामचंद्र शिंगाडे आदींसह गावातील युवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com