सिन्नरला आज विकासकामांचे भूमिपूजन

सिन्नरला आज विकासकामांचे भूमिपूजन

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सिन्नर तालुक्यातील ( Sinnar Taluka ) महत्त्वाच्या 9 रस्त्यांसाठी सुमारे 11 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. 15 कोटी खर्च होणार असलेल्या विकास कामांचे आज (दि.10) आ. माणिकराव कोकाटे ( MLA Manikrao Kokate ) यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे ( NCP )ज्येष्ठ नेते भगीरथ शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, गटनेते नामदेव लोंढे आदी उपस्थितीत राहणार आहेत.

चचोली ते नासाका रस्ता, विंचूर दळवी ते लहवित रस्ता, मापरवाडी ते भैरवनाथ मंदिर रस्ता, सोनांबे ते आडवाडी रस्ता, निमगाव ते भेंडाळी, केपानगर ते कोमलवाडी रस्ता, निर्हाळे ते गुलाबपूर, निर्हाळे ते यादव वस्ती, दोडी बुद्रुक ते ठाकरवाडी आदी 9 रस्त्यांची एकूण 21 किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्याची कामे होणार आहे. सिन्नर शहरात विठ्ठल मंदिर पेव्हर ब्लॉकही बसवले जाणार आहे. प्रभाग क्रमांक 1, 8, 9, 12 मध्ये पाईप गटार बांधकाम करणे कामे होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com