सोयगाव नववसाहतीत विकासकामांचे भूमिपूजन

सोयगाव नववसाहतीत विकासकामांचे भूमिपूजन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

सोयगाव (Soygaon) -नववसाहत प्रभाग 10 मधील विविध वसाहतींमध्ये रस्ता डांबरीकरण (Road asphalting), काँक्रीटीकरण (Concretization), आरसीसी गटार निर्मिती (RCC sewer construction), भुमीगत गटार (Underground sewers) आदी विविध 2 कोटी 12 लाखाच्या विकासकामांचे भुमीपूजन (bhumipujan) कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रभाग 10 मध्ये ना. भुसे यांच्या प्रयत्नामुळे नगरविकास निधीतुन (Urban Development Fund) प्रभाग क्र. 10 मध्ये रस्ते काँक्रीटीकरण करणे, रस्ता डांबरीकरण करणे तसेच उपमहापौर यांच्या निधीतुन आरसीसी गटार करणे व गटारीवर स्लॅब टाकणे तसेच भुमिगत गटार टाकण्याची कामे होणार असल्याने नागरिकांनी होणार्‍या विकासकामांबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले.

सोयगांव-नववसाहतमधील अ‍ॅरोमा स्टॉप ते शिव कॉलनीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामासाठी 65 लक्ष व मित्रनगर ते आनंदनगर या रस्त्यांचे डांबरीकरण करणे या कामासाठी 30 लक्ष तसेच उपमहापौर निलेश आहेर यांच्या निधीतुन राजमाता जिजाऊ उद्यान (डी.के.) एकता नगर ते सप्तश्रृंगी चौकपर्यंत आरसीसी गटार करणे व स्लॅब टाकणे या कामांसाठी 75 लक्ष, मित्र नगर, अष्टविनायक कॉलनी, जिभाऊ नगर, एकता नगर येथे भुमिगत गटार कामांसाठी 42 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कामांचे भुमिपुजन ना. भुसे यांच्या हस्ते परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कृषिमंत्री भुसे यांनी कामाच्या गुणवत्तेवर नागरीकांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. उपमहापौर निलेश आहेर (Deputy Mayor Nilesh Aher) यांनी उपस्थितांचे स्वागत करीत प्रभागात साकारत असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. रस्ते, उद्यान, भुमीगत गटारींसाठी आदी कामे साकारली जाणार असल्याने प्रभागाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमास ज्येष्ठ नेते मनोहर बच्छाव, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक जयप्रकाश बच्छाव, अ‍ॅड. आर.के. बच्छाव, नगरसेविका आशा आहिरे, शशीकांत निकम, डॉ. शरद बच्छाव आदींसह प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com