ई -चार्जिग स्टेशनचे खा. शिंदे यांच्या हस्ते भुमिपूजन

ई -चार्जिग स्टेशनचे खा. शिंदे यांच्या हस्ते भुमिपूजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर प्रदूषण (City pollution) आणि इंधनमुक्त करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्या प्रयत्नातून तसेच महानगरपालिका (Municipal Corporation) आणि युएनडीपीच्या (UNDP) सहकार्याने

शहरात 19 ठिकाणी चार्जिंग स्टेशन (Charging station) बसविण्यात येणार आहे. पैकी आज खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात महानगरपालिका आवाजातील प्रस्तावित ई -चार्जिग स्टेशनचे (E-charging station) भूमिपूजन (bhumipujan) संपन्न झाले. पालकमंत्री दादाजी भुसे (Guardian Minister Dadaji Bhuse) प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. आपलं नाशिक, हरित नाशिक होण्यासाठी ई चार्जिंग स्टेशन उभारणीच्या कामास खासदार शिंदे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

येत्या काही महिन्यात शहरातील प्रस्तावित असलेल्या सर्व ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी दिली आहे. युएनडीपी आणि महानगरपालिका यांच्या सयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन पटांगण, मनपा पश्चिम कार्यालय, गंगापूर रोडवरील महाजन गार्डन,

सातपूर कॉलनी, उपनगर येथील मातोश्रीनगर, बिटको हॉस्पिटल, जाकीर हुसेन हॉस्पिटल, महाकवी कलादास कला मंदिरासमोरील पार्किंग, महात्मानगर पटांगण, राजे संभाजी स्टेडियम, फाळके स्मारक, गोदावरी किनारी भाजी मार्केट, गोल्फ क्लब मैदान, पंचवटी तपोवन मंदिर आदी ठिकाणी ई- चार्जिग स्टेशन उभारण्यात येणार आहे.

प्रतिनिधीक स्वरूपात महापालिकेच्या आवारातील प्रस्तावित इ-चार्जिग स्टेशनचे भूमीपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सपंन्न झाले.यावेळी पालकमंत्री ना.दादाजी भुसे,महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.चंद्रकांत पूलकुंडवार, शिवसेनेचे प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्क प्रमुख राजूअण्णा लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, मनपा यांत्रिकी आणि विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, सुधाकर झाडे, नितिन धामणे, आरोग्य विभागाचे गोसावी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com