खा. गोडसेंच्याहस्ते उड्डाणपूलाचे आज भूमीपूजन

खा. गोडसेंच्याहस्ते उड्डाणपूलाचे आज भूमीपूजन

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

नाशिक-पूणे महामार्गावरील (Nashik-Pune highway) माळेगाव (malegaon) फाट्याजवळील बायपासवर 19 कोटी 96 लाख खर्च करुन उड्डाणपूल (flyover) बांधण्यात येणार असून या उड्डाणपूलाचे खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्या हस्ते भुमीपूजन (bhumipujan) करण्यात येणार आहे.

सिन्नरहून (sinnar) नाशिककडे (nashik) वळतांना बायपासवर वाहनांना ये-जा करणे धोकादायक बनले होते. येथे उड्डाणपूल (flyover) करावा अशी मागणी वाहनचालक अनेक वर्षांपासून करत होते. वाढते अपघात रोखण्यासाठी अनेकांनी खा. गोडसे यांना उड्डाणपूलासाठी साकडे घातले होते. माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau waje) यांनीही या उड्डाणपूलासाठी खा. गोडसे यांची भेट घेऊन सिन्नरकरांच्या मागणीकडे त्यांचे लक्ष वेधले होते.

या सर्वांच्या मागणीचा विचार करुन खा. गोडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी (Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari) यांची भेट घेऊन बायपासवर उड्डाणपूलाची आवश्यकता असल्याची त्यांना पटवून दिले होते. खा. गोडसे यांच्या मागणीची दखल घेत ना. गडकरी यांनी या उड्डाणपूलासाठी 11 कोटी 96 लाख रुपयांचा निधी (fund) मंजूर केला आहे. औरंगाबाद येथील देवपूळकर अ‍ॅण्ड ब्रदर्स या बांधकाम कंपनीने हे काम घेतले असून 11 महिण्यांत उड्डाणपूलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

खा. गोडसे यांच्या हस्ते उड्डाणपूलाचे भूमीपूजन होणार असून यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुनिता संजय सानप व पंचायत समितीचे माजी उपसभापती संग्राम कातकाडे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com