उद्या शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन

उद्या शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन

येवला | प्रतिनिधी Yeola

पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal )यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या येवला शिवसृष्टीचे ( Yeola Shivshrushtee )सोमवारी (दि.2) सायंकाळी 4 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शहरातील शिवसृष्टीसाठी आतापर्यंत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून 2 कोटी तर प्रादेशिक पर्यटन योजनेतून 4 कोटी अशा एकूण 6 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.

येवला शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीचा सर्व्हे नं.3812 गट नं. 100 ब मधील 2 एकर भूखंड देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शिवसृष्टी साठी हस्तांतरित करण्यात आला आहे. या शिवसृष्टी प्रकल्पाचे भव्य दिव्य असे स्वरूप असून यामध्ये सुशोभीकरण, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणविषयक अभ्यास, सुसाध्यता, संशोधनात्मक अभ्यास आदी बाबींचा विचार करून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार्‍या या प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रांझ धातूचा सिंहासनाधिष्टीत मेघडंबरीसह पूर्णाकृती पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील ठळक घडामोडी व महाराजांच्या सेनापतींचे चित्रशिल्प भित्तीचित्रे, ऑडिओ व्हिडिओ हॉल, शिवकालीन शस्रारांचे प्रदर्शन, पुस्तक व साहित्य विक्री केंद्र, माहिती केंद्र आणि कार्यालय, किल्ले स्वरूपाचे प्रवेशद्वार व अनुषंगिक मांडणी, वाहनतळ, शिवसृष्टी आवारात उद्यान, टप्पे स्वरूपातील कारंजे व सुशोभीकरणाच्या अनुषंगिक बाबी, स्वच्छतागृह व उपहारगृह, परिसरात अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मलनिःसारण इत्यादी कामे करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.